मुंबई | नालासोपारा स्फोटके प्रकरणातील आरोपी समोर येताच, महाराष्ट्र एटीएसने कर्नाटकच्या विशेष पथकाने पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी अमोल काळेसह, अमित बिड्डे, गणेश मिस्कीन अशा तिघांचा ताबा शनिवारी घेतला आहे. विशेष न्यायालयाने तिघांना १२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी नालासोपारा आणि राज्यात ठिकठिकाणी छापे टाकून स्फोटके आणि शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकरसह, शरद कळसकर, अविनाश पवार, वासुदेव सूर्यवंशी आणि लीलाधर उर्फ विजय उर्फ लंबू उखडूर्ली लोधी,सुजीत कुमार आणि भरत कुरणे यांनाही अटक केरण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीमध्ये हा स्फोटकांचा साठा पुणे येथे होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात करण्यासाठी वापरण्यात येणार होता, अशी माहिती पुढे आली आहे. अमोल काळे, अमित बिड्डे आणि गणेश मिस्कीन या तिघांच्या चौकशीतून आणखी बरीच माहिती पुढे येण्याची शक्यता असल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
Nalasopara Explosive Case: Amol Kale, Amit Baddi & Ganesh Mistre, 3 arrested accused by Bengaluru SIT in Gauri Lankesh murder case, were produced before Sessions Court, Mumbai by Maharashtra ATS. They have been sent to police (ATS) custody till 12 October. #Maharashtra
— ANI (@ANI) October 6, 2018
तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरे याला अमोल काळे यानेच पिस्तुल पुरविल्याची माहिती याआधी सीबीआयच्या वतीने न्यायालयात देण्यात आली होती. तर सूर्यवंशीने गुन्ह्यात कर्नाटकच्या धारवडमधून वाहने चोरी केली होती. या चोरीत सचिन अंदुरे, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी या तिघांचाही सहभाग असल्याने तिघांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्याची मागणी केली आहे. आरोपींचे वकील संजीव पुनाळेकर यांनी याला विरोध केला आहे. चोरी प्रकरणावेळी तिघेही न्यायालयीन कोठडीत होते. त्यामुळे त्यात त्यांचा सहभाग असणे शक्य नाही. त्यामुळे न्यायालयाने तिघांना ६ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.