श्रीनगर | रमजानच्या पवित्र महिन्यात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील कारवाया थांबविण्यात याव्या, अशी मागणी जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे. रमजानचा महिना जवळ येत असून या काळात मुस्लीम नागरिक दिवस रात्र प्रार्थना करतात आणि मशिदीत जातात.
Mehbooba Mufti, PDP: I would also like to appeal to the militants that Ramadan is a month of worship & prayers. They should not make any attacks during this time. https://t.co/nNPhwgWc0M
— ANI (@ANI) May 4, 2019
गत वर्षी जसे रमजानच्या महिन्यात केंद्र सरकारने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच प्रमाणे यंदाही सरकारने रमजानच्या काळात दहशतवाद्यांविरोधातील कारवाया, शोध मोहिम बंद कराव्यात, शोध मोहिम बंद कराव्यात. यामुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांना एक महिना तरी शांतता मिळेल, अशी मागणी मुफ्ती यांनी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी दहशतवाद्यांना देखील रमजानच्या काळात हल्ले करू नका, असे देखील आवाहन मुफ्ती यांनी केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.