नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोकसीचा सहकारी दीपक कुलकर्णीला कोलकात्याहून अटक करण्यात आली आहे. ईडी आणि सीबीआयने एकत्रितरित्या ही कारवाई केली आहे. नीरव मोदी याच्याविरुद्ध एक फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याने काही मौल्यवान वस्तू २६ जहाजांमध्ये भरून हाँगकाँगला पाठविल्या होत्या. “हाँगकाँगहून परतलेल्या दीपक कुलकर्णीला कोलाकाता विमानतळावर अटक करण्यात आली असून मंगळवारी त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे”, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Deepak Kulkarni, an associate of #MehulChoksi has been arrested by the Enforcement Directorate in Kolkata after he landed at the airport from Hong Kong. Kulkarni was the director of Choksi’s dummy firm in Hong Kong. A Look Out Circular was issued against him by ED and CBI earlier pic.twitter.com/AJxfhr695c
— ANI (@ANI) November 6, 2018
ईडीने काहीच दिवसांपूर्वी पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी आणि त्याचा सहकारी मेहुल चोक्सी यांना आर्थिक फरारी गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात यावे व त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मिळावी, यासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज सादर केला होता. पीएनबीला तब्बल १४ हजार कोटींचा गंडा लावणाऱ्या नीरव मोदीने मात्र ईडीचे सर्व आरोप फेटाळले आहेत. ईडीच्या अर्जावर उत्तर देत मी फरार नसून मी तपासासाठी सहकार्य करत नसल्याचा ईडीचा दावा खोटा असल्याचे त्याने म्हटले आहे. या संपूर्ण घोटाळ्याचा कट हा नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी त्यांच्या अन्य सहकाऱ्यांसह मिळून रचला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.