मुंबई। जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोनावर औषध शोधण्याचे काम सुरू असतानाच योगगुरू रामदेव बाबा यांनी पतंजलीने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लाँच केले आहे. या औषधामुळे १०० टक्के रुग्ण बरे होतात आणि ० टक्के मृत्यूदर असल्याचाही दावा रामदेव बाबा यांनी केला आहे. रामदेव बाबा यांनी हरिद्वार येथे औषधाचे आज (२३ जून) उद्धाटन केले. रामदेव बाबाच्या औषधाचे नाव कोरोनील आणि श्वासारीचे असे आहे. मात्र, आता पतंजली कंपनीने योग्य तपासणी होईपर्यंत कोरोनिल औषधाची जाहिरात न करण्याचे आदेश आयुष मंत्रालयाने दिले आहे.
Ministry has taken cognizance of news in media about Ayurvedic medicines developed for #COVID19 treatment by Patanjali Ayurved Ltd. The company asked to provide details of medicines & to stop advertising/publicising such claims till the issue is duly examined: Ministry of AYUSH pic.twitter.com/OBpQlWAspu
— ANI (@ANI) June 23, 2020
आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीने कोरोनावरील उपचारासाठी विकसित केलेल्या ‘कोरोनिल’ औषधाची आम्ही दखल घेतली आहे. पतंजली कंपनीने औषधाची योग्य ती माहिती द्यावी आयुष मंत्रालयाला द्यावी, असे सांगितले आहे. तसेच पतंजलीने क्लिनिकल ट्रायल झाल्याचा दावा केला आहे. मात्र, पतंजलीकडून त्याचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत, असे आयुष मंत्रालाने स्पष्ट केले आहे.
योग्य तपासणी होईपर्यंत औषधाची जाहीर बंद
त्यामुळे कोरोनिल औषधाची योग्य ती तपासणी होईपर्यत या औषधामुळे कोरोना आजार बरा होतो, अशा आशयाची जाहिरात न करण्याचे आदेश देखील आयुष मंत्रालयाकडून पतांजलीला देण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.