HW News Marathi
देश / विदेश

वाजपेयींना श्रद्धांजली देण्यास नकार देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला मारहाण

औरंगाबाद | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दिर्घ आजाराने आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. सभेच्या सुरुवातीला माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात येत होती. याला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध दर्शवला.

यानंतर सभागृहातील संतप्त भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांनी मतीन यांना लाथा-बुक्क्यांनी तुडवत बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर नगरसेवक मतीन यांनी सभागृहातून पळून गेले.

या प्रकारानंतर पालिकेच्या आवारात भाजप आणि एमआयएमचे कार्यकर्ते आप आपसात भिडले. यात भाजपचे संघटनमंत्री भाऊसाहेब देशमुख यांची चारचाकी एमआयएमच्या कार्यकर्त्यंनी फोडली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बँक लुटण्यासाठी खोदला दोन हजार फूट लांबीचा बोगदा

News Desk

संजय राऊतांच्या दिल्लीतील घरी रंगलेल्या मैफिलीचे खास फोटो ,भाजपचे खासदारही उपस्थित…

News Desk

केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन काल घसरले, १८ जणांचा मृत्यू तर विमानाचे झाले २ तुकडे 

News Desk