लंडन | पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात फरार झालेला हिरा व्यापारी नीरव मोदी ब्रिटनमध्ये असल्याची माहिती ब्रिटिन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीबीआयने नीरव मोदीला प्रत्यार्पणासाठी सीबीआयकडे ब्रिटनकडे मागणी केली आहे.
CBI has requested Interpol Manchester to detain #NiravModi in the UK: Sources (file pic) pic.twitter.com/ytLvWEpWqO
— ANI (@ANI) August 20, 2018
United Kingdom authorities have confirmed that Nirav Modi is in the U.K and CBI has moved an extradition request through proper channels: CBI pic.twitter.com/dZrXkqERhk
— ANI (@ANI) August 20, 2018
गेल्या काही दिवसापासून सीबीआय नीरव मोदीच्या ठिकाणांचा शोध घेतला जात आहेत. गेल्या जुलै महिन्यात नीरव मोदी विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली होते. नीरव मोदी विरुद्ध महसूल गुप्तवार्ता संचालनालया (डीआरआय)ने खटला दाखल केला होता.
सूरत येथील न्यायालयाने नीरव विरुद्ध अटक वॉरन्ट जारी केले आहे. फायरस्टार इंटरनॅशनल, फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल व रॅडाशिर ज्वेलरी या नीरव मोदीच्या तीन कंपन्यांनी ‘ड्युटी फ्री’ पद्धतीने आयात केलेल्या पैलू पाडलेल्या हि-यांची व मोत्यांची हेराफेरी केल्याच्या आरोपावरून हा खटला दाखल करण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.