नवी दिल्ली | लोकसभेत आज (२१ जून) तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मांडले गेले. कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत तिहेरी तलाक मांडले. परंतु विरोधकांनी या विधेयकला विरोध करत संसदेत गोंधळ घातला. विधेयक सादर झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी मतदान घेतले. यानंतर या विधेयक ७४ विरुद्ध १८६ मतांनी पास करण्यात आले.
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही तात्काळ तिहेरी तलाकविरोधी विधेयकाचा विरोध केला. ते म्हणाले की, “हे विधेयक आर्टिकल १४ आणि १५ चे उल्लंघन नाही का? तुम्ही महिलांचे हित पाहत नाही. तुम्ही त्यांच्यावर ओझे टाकत आहात. तलाक म्हणणारा तीन ३ वर्ष जेलमध्ये राहिला तर पोटगी कोण देणार? तुम्ही देणार का? तुमचे मुस्लीम महिलांवर एवढे प्रेम आहे. मग केरळच्या हिंदू महिलांवर का नाही? तुम्ही शबरीमलाच्या निर्णयाविरोधात आहात का? चुकीचे होत आहे.”
Union Minister Ravi Shankar Prasad: We have always stated that Triple Talaq is neither an issue of religion nor of prayer nor of any other communal consideration. It is a pure & simple issue of 'insaaf' – women justice, women dignity and women empowerment. https://t.co/zfSA8YuIpG
— ANI (@ANI) June 21, 2019
कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, लैंगिक समानता आणि न्यायासाठी हा कायदा मंजूर होणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमद्ये लोकसभेत हे विधेयक पास झाले होते. परंतु राज्यसभेमध्ये प्रलंबित ठेवण्यात आले होते. कारण राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन लोकसभेमध्ये हे विधेयक पुन्हा नव्याने आणण्यात आले आहे.
A Owaisi: If a man gets arrested, how will he give allowance from jail? Govt says if a Muslim man commits this crime the marriage will remain intact&he'll be jailed for 3 yrs if punished by court. He'll be jailed for 3 yrs but marriage will be intact! What law is Mr Modi forming? https://t.co/vVANHqvHu1
— ANI (@ANI) June 21, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.