नवी दिल्ली | आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी एक दिवसाच्या उपोषणाला बसले आहे. चंद्राबाबू यांनी दिल्लीतील आंध्र भवनमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून उपोषणाला बसले आहेत. आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील चंद्राबाबूची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. केजरीवाल यांनी चंद्राबाबूंची भेट घेऊन मंचावर उपस्थितांना संबोधित करताना त्यांची जीभ घसरली.
Delhi CM Arvind Kejriwal: Hum Pradhan Mantri Ji ko kehna chahate hain, woh BJP ke PM nahi hain, woh is desh ke logon ke PM hain. Jis tarah se PM vipakshi rajyon ke sarkaron ko treat karte hain, aise treat karte hain jaise pradhan mantri Hindustan ke nahi Pakistan ke hain. pic.twitter.com/rqH5xKMYZJ
— ANI (@ANI) February 11, 2019
केजरीवाल म्हणाले की,”मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छितो की, ते फक्त भाजपचे पंतप्रधान नाही, तर ते देशातील जनतेचे पंतप्रधान आहे. ज्याप्रमाणे मोदी विरोधी राज्यांच्या सरकारबरोबर पाकिस्तानच्या पंतप्रधानांसारखे वागतात,” असे वादग्रस्त विधान केले आहे. केजरीवाल यांच्या वादग्रस्त विधानावर अद्याप भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी, केजरीवाल यांच्या विधानावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. या वक्तव्याचे किती पडसात पडतील हा येणार काळच सांगेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.