नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७२वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा झाला. मोदींनी लाल किल्यावरून ध्यजारोहण करून देशवासीयांना संबोधित केले. २०१९ लोकसभा निवडणुकांपुर्वी मोदींचे हे अखेरचे भाषण आहे. मोदींनी गरीबांसाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची घोषणा केली. आजचा सूर्योदय नवी उमंग, उत्साहाला घेऊन आला आहे, असे भाषणाच्या सुरुवातीला मोदी म्हटले आहे.
तिहेरी तलाकवर कायदा करणार
तिहेरी तलाकमुळे अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आम्ही कायदा करतोय, पण त्याला काही जण विरोध करत आहेत. मात्र मुस्लिम महिलांना मी आश्वस्त करतो, आम्ही तो कायदा करणारच असल्याचे ठोस आश्वास मोदींनी दिले.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची घोषणा
येत्या २५ सप्टेंबरला पं. दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीला पंतप्रधान जनआरोग्य योजना सुरु होणार आहे. देशातील १० कोटी कुटुंबांना (५० कोटी नागरिकांना)वार्षिक पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा. सामान्य नागरिकांना गंभीर मेडिकल उपचारांची चिंता जाणवणार नाही.
वैज्ञानिकांचा गौरव
देशातील प्रगतीत सर्वात महत्त्वाचे वैज्ञानिकांचे योगदान असल्याचे मोदी म्हटले आहे. वैज्ञानिकांनी एकाच वेळी अंतराळात १०० उपग्रह सोडून विक्रमी कामगिरी केली. २०२२ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बनावटीच्या पहिला भारतीय अंतराळाची सफर करू शकेल, असे मोदींनी सांगितले.
कर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ
देशात कोट्यवधी गरीब लोक आहेत. त्यांच्यावर सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करते. याचे श्रेय सरकारला न जाता ते करदात्यांना जाते. २०१३ पर्यंत ४ कोटी नागरिक टॅक्स भरत होते, सध्या तो आकडा पावणे सात कोटीवर जाऊन पोहोचला आहे. आज देश इमानदारीचा उत्सव साजरा करत आहे. आम्ही ‘भाई-भतीजा’वाद संपवला आहे. या करदात्यांमुळेच देशासाठी, गरिबांसाठी अनेक योजना राबवणे शक्य होते. देशातील करदात्यांमुळे लाखो कुटुंबाचे पोट भरते, असे मोदी म्हणाले.
उद्योजकांनी जीएसटी स्वीकार
देशात जीएसटी लागू केल्यानंतर देशातील उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. तसेच देशातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी खुल्या माने जीएसटीचा स्वीकार केला हे खरच कौतुकास्पद असल्याचे मोदी म्हटले.
स्वच्छ भारत अभियान
आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वच्छता अभियानाची दखल घेतली असल्याची माहिती मोदींनी भाषणा वेळी दिली. WHOच्या अहवालानुसार, भारतात स्वच्छता अभियानामुळे तीन लाख मुलांचे प्राण वाचल्याचे मोदींनी सांगितले.
एव्हरेस्टवर तिरंगा
एव्हरेस्ट विजय तर खूप झाले जेव्हा मुलींनी एव्हरेस्ट वर तिरंगा फडकवला परंतु ह्या वर्षी खेड्यापाड्यातल्या आदिवासी मुलांनी तिरंगा फडकवला आणि शान वाढवली
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.