HW News Marathi
Covid-19

Corona World Update : जगभरात ३१ लाखांहून अधिकजणांना कोरोनाची लागण

मुंबई | जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. जगभरात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाबाधितांची संख्या जगभरात ३१ लाख ३६ हजार २३२ वर येऊन पोहोचली आहे. तर, जगभरात ९ लाख ५३ हजार रुग्ण बरे झाले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात २ लाख १७ हजार ७९९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासात जगात ६ हजार ३५१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरातील २१० देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे.

कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत ५८ हजार ३५५ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांतच इथे २२०० कोरोनाग्रस्त रुग्ण मृत्यूमुखी पडले, असे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने दिले आहे. अमेरिकेत आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त व्यक्तींना कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये या दोन्ही देशात मिळून कोरोनामुळे २३ हजार ८२२ लोकांचा मृत्यू झाला. स्पेनमध्ये २३२१२३ कोरोनाची लागण झाली. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यामध्ये इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत २६ हजार ९७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ९७ हजार ४१४ इतका आहे.

जभरातील कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यांचा आकडेवारी

  • फ्रांस – कोरोनाबाधित- १६५,९११, मृत्यू – २३,६६०
  • यूके – कोरोनाबाधित- १६१,१४५ मृत्यू – २१,६७८
  • जर्मनी – कोरोनाबाधित- १५९,९१२, मृत्यू – ६,३१४
  • टर्की – कोरोनाबाधित- ११४,६५३, मृत्यू – २,९९२
  • रशिया – कोरोनाबाधित- ९३,५५८, मृत्यू – ८६७
  • इरान – कोरोनाबाधित- ९२,५८४, मृत्यू – ५,८७७
  • चीन – कोरोनाबाधित- ८२,८३६, मृत्यू – ४,६३३
  • ब्राझिल – केस- ७२,८९९, मृत्यू – ५,०६३
  • कॅनडा – कोरोनाबाधित- ५०,०२६, मृत्यू – २,८५९
  • भारत – कोरोनाबाधित- ३१३२४, मृत्यू – १००८

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरणार

News Desk

राज्यात आज ९८२५ नवे रुग्ण आढळले, तर २९८ जणांचा झाला मृत्यू

News Desk

निलेश लंकेंचा थेट कोविड सेंटरमध्ये मुक्काम! रुग्णसेवेचा अहोरात्र सपाटा सुरुच

News Desk