HW News Marathi
देश / विदेश

आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे म्युझियम “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे ओळखले जाणार

लखनऊ | आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे “छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय” असे नामांतर करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल (१४ सप्टेंबर) या संदर्भात घोषणा केली आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आग्रा विभागातील विकासकामांचा आढावा घेतला होता. यावेळी आग्र्यातील निर्माणाधीन मुघल संग्रहालय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे तयार होईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

ताजमहलमुळे जगभरात प्रसिद्ध असलेल्या आग्र्यात सध्या मुघल म्युझियमचे बांधकाम सुरू आहे. परंतु योगी सरकारने आता या म्युझियमचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे मुघल म्युझियम आता मुघलांना आव्हान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. आग्र्यातील विकास कामांचा आढावा घेताना स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली.

या निर्णयाची माहिती योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरुन दिली. “आग्रामध्ये सुरु असलेलं म्यूझियम आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखलं जाईल. तुमच्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामीच्या मानसिकतेच्या प्रतिकांचं कोणतंही स्थाना नाही. आपल्या सगळ्यांचे नाकय शिवाजी महाराज आहेत. जय हिंद, जय भारत.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ चित्ररथ सज्ज

Aprna

पंकजा मुंडे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, उधाण

News Desk

उत्तर प्रदेशात महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय क्रांतीकारीच !: नाना पटोले

News Desk