HW News Marathi
देश / विदेश

मुंबईकराने वडापाव विकून केली शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत

मुंबई । मुंबईवर किंवा देशावर जेव्हा जेव्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तेव्हा तेव्हा मुंबईकर मदतीसाठी धावून आले आहेत. . पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एका मुंबईकराने जवानांसाठी पुढे केलेला मदतीचा हात उल्लेखनीय आहे. एल्फिस्टन भागात राहणारे मंगेश अहिवळे हे वडापाव विक्रेते आहेत. त्यांनी सैनिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मंगेश हे वर्षातून किमान १५ सामाजिक स्तरावरील कार्यक्रम घेतात. या अंतर्गतच त्यांनी “आपला वडापाव” हा एक अतिशय उत्तम उपक्रम हाती घेतला आहे.

काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय सैन्याचे ४० जवान शहीद झाले. या भीषण हल्ल्यानंतर शहीदांच्या कुटुंबियांना देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मंगेश यांनी सुद्धा आपल्या वडापावच्या माध्यमातून पुन्हा एकदा जवानांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी (२२ फेब्रुवारी) हा मदतीचा उपक्रम एल्फिस्टन येथे सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू करण्यात आला होता. ह्या विक्रीतून येणारे सर्व उत्पन्न सैनिकांना मदत म्हणून देण्यात आली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अण्वस्त्रबंदीच्या दिशेने उत्तर कोरियाचे एक पाऊल पुढे

News Desk

“कपिल देवपेक्षा इम्रान खान खूप भारी क्रिकेटर होता”-माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक

News Desk

‘भाजप चले जाव म्हणायची वेळ आली’, नाना पटोलेंचा केंद्रावर हल्ला

News Desk