HW Marathi
देश / विदेश राजकारण

ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, कोलकाताच्या रुग्णालयात उपचार

कोलकाता | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांनी आरोप केला आहे की नंदीग्रामच्या बिरुलिया गावात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ४-५ लोकांनी जबरदस्तीने त्यांच्या गाडीचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली. हल्ला झाल्यानंतर ग्रीन कॉरिडॉर बनवून ममता बॅनर्जी यांना कोलकातामध्ये आणण्यात आलं आहे. सध्या त्यांना SSKM रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. SSKM रुग्णालयाने ५ सदस्यीय मेडिकल बोर्डची स्थापना केली आहे. त्यात कार्डियोलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक, न्यूरो सर्जनसह अन्य तज्ज्ञांचा सहभाग आहे. SSKM रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.

 

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी कळताच SSKM रुग्णालयाबाहेर आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वत्र तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत आहे. ममता बॅनर्जी यांना भेटण्यासाठी राज्यपाल जगदीप धनखडही रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी TMC कार्यकर्त्यांनी गो बॅकच्या घोषणा दिल्या.

ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली आहे. ‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याची बातमी चिंताजनक आहे. त्यांना लवकर आराम मिळो ही प्रार्थना. या प्रकरणी तात्काळ एक उच्च स्तरीय समिती स्थानप करुन तपास केला जावा’, असं ट्वीट यादव यांनी केलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्वीट करुन ममता बॅनर्जी यांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना केली आहे.

 

Related posts

रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेडच्या मालमत्तेवर ईडीचा छापा!

News Desk

‘कोरोना’च्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार !

अपर्णा गोतपागर

“बेळगावमध्ये शिवरायांचा पुतळा काँग्रेस नेत्याने हटवलाय, शिवसेना राजीनामा देणार का ?”

News Desk