HW Marathi
देश / विदेश राजकारण

पंतप्रधान मोदी अन् अमित शहांनी जनतेला दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई | देशातील ‘कोरोना’चे वाढते संकट लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता देशात लॉकडाऊन जारी केला आहे. मंगळवारी (२४ मार्च) देशाला संबोधित करत असताना पंतप्रधानांनी पुढे २१ दिवसांसाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यातच आज (२५ मार्च) मराठी नूतन वर्षाचा अर्थात गुढीपाडव्याचा सण आहे. कोरोनाच्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊनची स्थिती असल्याने आता प्रत्येकाला हा सण आपल्याच घरात आणि साधेपणाने साजरा करायचा आहे. याच निमित्ताने पंतप्रधान मोदींनी देखील ट्विटरवरून नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांसोबत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील मराठीत ट्विट करून नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“महाराष्ट्रातील लोक आज गुढीपाडवा साजरा करत आहेत. मी त्यांना यश, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देतो. यावर्षी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत”, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील लोकांना शुभेच्छा दिल्या. तर “कोरोना- मुक्तीची गुढी उभारूया…नवीन वर्ष २१ दिवस घरी थांबून साजरे करूया…तुम्हां सर्वांना गुढी पाडवा आणि नव वर्षाच्या शुभेच्छा…आपणांस व आपल्या परिवारास हे नवीन वर्ष आनंदाचे, भरभराटीचे आणि उत्तम आरोग्याचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
घरी राहू…सुरक्षित राहू…”, असे म्हणत अमित शहांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत घरातून बाहेर न पाडण्याचे आवाहनही केले आहे. याचसोबत देशासह राज्यातील अनेक नेतेमंडळींनी देखील लोकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Related posts

ठाण्याच्या कचर्‍यावर पोसली जातेय शिवसेना !

News Desk

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू बकरला दुबईत अटक

News Desk

यंदा शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार !

News Desk