HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशवासीयांना केले संबोधित !

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१५ ऑगस्ट) यांनी ७४ व्या स्वातंत्र्यदिनी भाषणाला सुरुवात करत आधी सर्व देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कोरोनाच्या काळात ज्या पोलिसांनी, सैनिकांनी, डॉक्टरांनी, संरक्षण अशा सर्वांनी भारतासाठी बलिदान दिले त्यांना अभिवादन देखील केले.स्वातंत्र्याचं पर्व आपल्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि नवे संकल्प करण्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे.

लहान मुलं यावेळी लाल किल्ल्यावर दिसत नाहीत, कोरोनाने सर्वांची वाट अडवली, ‘सेवा परमो धर्म’ मानणाऱ्या सर्व कोरोना योद्ध्यांना नमन. बापूंच्या नेतृत्वात त्या आंदोलनाने स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा दिली. भारताला आपली संस्कृती, परंपरा याच्यापासून तोडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. भारतावर राज्य करणाऱ्यांना वाटत होतं हा देश भाषा, धर्म आणि अनेक स्तरावर विभागलेला आहे. त्यावर राज्य करणं सोपं आहे असं त्यांना वाटत होतं. मात्र त्यांना भारताच्या विविधतेत देखील असलेला एकजीणसीपण माहिती नव्हता. त्यावेळी विस्तारवादाने अनेक प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली घेतले. मात्र, भारताची स्वातंत्र्य चळवळ जगभरात वेगळी ठरली. विस्तारवादाने जगाला दोन महायुद्धांमध्ये झोकले आहे.

कोरोनाशी लढा देणाऱ्या सर्व कोरोना योद्ध्यांना देखील मी नमन करतो. कोरोना नियंत्रणासाठी काम करणाऱ्या अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्यांच्या कुटुंबीयांना बाधा झाली, काहींना तर आपला जीवही गमवावा लागला त्या सर्वांना मी नमन करतो. मला विश्वास आहे आपण हे कोरोना युद्ध जिंकू. मागील काही काळापासून आपण अनेक संकटांचा सामना करत आहोत. पुराने देखील देशाला फटका बसला आहे. मात्र, आपण या संकटाच्यावेळी सर्व राज्यांच्या खांद्याला खांदा लावून मदत पोहचवण्याचं काम केलं जात आहे.

श्री अरविंद घोष क्रांतीदुतापासून अध्यात्मापर्यंतचा प्रवास त्यांनी केला. त्यांचा आज जन्मदिन आहे. आपण एका विशिष्ट परिस्थितीतून जात आहोत. आज मला माझ्यासमोर भारताचं भविष्य असलेले लहान मुलं बसलेले दिसत नाहीत. कोरोनाने काही आव्हानं उभी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार,राष्ट्रवादीने दिलं स्पष्टीकरण

News Desk

आपच्या मदतीला यशवंत सिन्हा

swarit

बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा दिला राजीनामा

Aprna