मुंबई | देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात चौथ्या टप्प्याची लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने याबाबतची घोषणा केली. लॉकडाऊन चौथ्याच्या नव्या नियमावली जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळा-कॉलेज बंदच राहणार आहे. तसेच मेट्रो-लोकल सेवाही बंदच राहणार असेही यात नमूद करण्यात आले आहे.
National Disaster Management Authority (NDMA) also directs National Executive Committee (NEC) to issue modifications in the guidelines, as necessary keeping in view the need to open up economic activities while containing the spread of #COVID19. https://t.co/uHXVriHvoW
— ANI (@ANI) May 17, 2020
महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. ३१ मेनंतर पुढील निर्णय सूचित करण्यात येईल, असे राज्य सरकारने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्या स्वाक्षरीने जारी आदेशात ३१ मे पर्यंत पूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. आपत्कालीन व्यवस्थान कायदा 2005 आणि साथरोग नियंत्रण कायदा १८९७ नुसार राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन अजॉय मेहता यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला आहे. तर आता महाराष्ट्रपाठोपाठ तामिळनाडू सरकारनेही ३१ मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे. तामिळनाडूमध्ये १२ जिल्ह्यांना या लॉकडाउनमधून दिलासा देण्यात आलेला नाही. वाहतूक, सार्वजनिक ठिकाणे आणि शाळा बंदच राहणार असल्याचे तामिळनाडू सरकारने सांगितले आहेत.
देशात लॉकडाऊन असा वाढवला कालावधी
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने २५ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषला केली. या २१ दिवसांच्या लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार होता. मात्र, तरी देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम असल्याचे पाहून हा लॉकडाऊन पुन्हा १९ दिवसांसाठी वाढवण्यात आला. या लॉकडाऊनचा कालावधी ३ मे ला संपणार होता. मात्र, आज पुन्हा दोन आठवड्यांसाठी हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन ४ मे पासून १७ मेपर्यंत राहणार आहे.
संबंधित बातम्या
महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्याने ३१ मेपर्यंत वाढवला लॉकडाऊन
महाराष्ट्रातला लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.