HW News Marathi
देश / विदेश

काश्मीर मुद्द्यावरून अमित शहा आणि अजित डोवाल यांची बैठक

नवी दिल्ली । काश्मीरमध्ये सुरू असलेल्या लष्करी हालचाली वेग वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत गृहसचिव राजीव गौबा हेसुद्धा उपस्थित होते. या बैठकीत काश्मीर प्रश्नावर चर्चा होऊन पुढील रणनीती ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

काश्मीरमधील वाढत असलेला फौजफाटा पाहता देशभरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काश्मीरमधील परिस्थितीबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात असून, अफवांना ऊत आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी सुरक्षेचे कारण केंद्र सरकारने अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना तत्काळ काश्मीर सोडण्याचा आदेश देणारे पत्रक प्रसिद्ध केले होते. तेव्हापासून काश्मीरमधील घटनाक्रमाबाबत विविध शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

तसेच केंद्र सरकार काश्मीरमध्ये काहीतरी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अशाप्रकारची शक्यता फेटाळून लावली असून तसेच केवळ सुरक्षेच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल असल्याचे म्हटले जाते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल

News Desk

Union Budget 2021 |  मिशन पोषण 2.0 ची अर्थमंत्र्यांकडून घोषणा

News Desk

ओडिशात धुमाकूळ घालणाऱ्या वादळात जन्मली ‘फनी’

News Desk