HW News Marathi
देश / विदेश

नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्याविरोधात पुकारले बंड

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पहिल्यांदाच पंजाब सरकाने कॅबिनेट मंत्र्यांची आज (६ जून) बैठक बोलविली होती. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या बैठकीत नवज्योत सिंग सिद्धू अनुपस्थितीमुळे पंजाब काँग्रेसमधील दोन दिग्गज नेत्यामध्ये दरी निर्माण झाली असल्याचे उघड झाली आहे.

माझ्यावर पंजाबमधील दोन मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली होती. या दोन्ही जागांवर काँग्रेसचा बहुमताने विजय झाला आहे. परंतु भठिंडा मतदारसंघात झालेल्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु हे चुकीचे आहे. अनेक मंत्री माझ्या राजीनाम्यावर टपून बसले आहेत. कॅप्टनसाहेबही पराभवासाठी मला जबाबदार धरत आहे, परंतु याला सर्वच जबाबदार आहेत, असे प्रसार माध्यमांशी बोलताना सिद्धू म्हणाला.

पंजाब काँग्रेसमधील दोन प्रमुख चेहरे असलेले मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाही. उभय नेत्यांमध्ये झालेल्या वादानांतर सिद्धू यांनी उघड-उघड मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याविरुद्ध दंड थोपटल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या कॅबिनेट बैठकीला सिद्धू यांनी दांडी मारली. तसेच मुख्यमंत्र्यांना टोला देखील लगावला. कॅबिनेट बैठकीत पंजाबमधील काही मंत्र्यांचे विभाग देण्यात येणार असून तर काहींना मंत्रीमंडळातून पाय उतार करण्याच्या चर्चा राजकारणार रंगल्या आहेत. यात सिद्धूकडून त्यांचे मंत्रीपद काढून घेण्यात येणार असल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाल्या आहेत.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय सुरक्षा दलाने निष्पाप काश्मीरमधील नागरिकांना मारले !

swarit

अल कायदाच्या म्होरक्याची कश्मीरवर आत्मघाती हल्ला करण्याची धमकी

News Desk

#ConstitutionDay : जाणून घ्या… का साजरा केला जातो संविधान दिवस

News Desk