HW News Marathi
Covid-19

साखरेवर बोल्यावर मिरची का लागली ?, निलेश राणे-रोहित पवारांमध्ये रंगले वाकयुद्ध

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे नेते निलेश राणे यांच्यावर ट्वीटवर वाकयुद्ध रंगले दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साखर उद्योगांना वाचवा, या संदर्भात पत्र लिहिले आहे, यावरून निलेश राणे यांनी ट्वीट करत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. आजोबांवर केलेल्या टीकेला नातू रोहित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

रोहित पवार ट्वीटमध्ये म्हणाल, “मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवार साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत.साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी.” या ट्वीटमध्ये रोहित पवार यांनी ‘कुक्कुटपालन’ अधोरेखित केला आहे. या एका शब्दामुळे राज्याच्या राजकारण चांगलेच चर्चा विषय बनले आहे.

निलेश राणेंनी ट्वीटमध्ये म्हटले, “साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर audit झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा?? साखर उद्योगाला वाचवा; शरद पवारांचं मोदींना पत्र,” असे म्हणाले.

“मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही… कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी,” असे ट्वीट करत रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले.

राणेंनी दुसरे ट्वीटमध्ये लिहिले, “हे रोहित पवार सारखे शेंबडे लुडबुड करत असतात. साखरेवर बोललो की हे अस्वस्थ का होतात कुणास ठाऊक?? महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात संपत्ती एका दिशेने जात असेल तर प्रश्न नाही विचारायचे?? ह्या वांग्याला सांगा ते ठाकरे मुंबईत राहून नाय काय करू शकले हा तर अजून स्वतःची धुवायला शिकतोय.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड नगर परिषद प्रशासनाच्या भाजी-फळ विक्रेत्यांवरील कारवाईचा संदीप क्षीरसागर यांच्याकडून निषेध

News Desk

राज्यात आतापर्यंत ४ लाख ३८ हजार ७५१ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

News Desk

महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करावा !

News Desk