HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रवादीचे ‘राष्ट्रीयत्व’च धोक्यात, निवडणूक आयोगाची नोटीस

मुंबई | लोकसभेत झालेल्या दारुण पराभवाचा धक्का पचविण्यापूर्वीच आता राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याची माहिती मिळत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘राष्ट्रीयत्व’च धोक्यात आल्याची माहिती मिळत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने अनेक राजकीय पक्षांना त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्यासंबंधीची नोटीस बजावली आहे. या राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अत्यंत अनपेक्षित अशा पराभवाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर एकीकडे काँगेस-राष्ट्रवादीसाठी राज्यात अत्यंत गंभीर स्थिती निर्माण झालेली असतानाच आता दुसरीकडे निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचा राष्ट्रीय पदाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाच्या या नोटिशीला २० दिवसांमध्ये उत्तर दिले नाही तर राष्ट्रवादीचा ‘राष्ट्रीय पक्षा’चा दर्जा काढून घेतला जाण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंजाबी सुप्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्ध मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या

Aprna

ऐतिहासिक निर्णय! सर्वोच्च न्यायालयाच्या घटनपीठाकडून आर्थिक दुर्बल घटकांचे 10 टक्के आरक्षण वैध

Aprna

देशात पहिल्या नंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच!

News Desk