मुंबई | नव्या वर्षाच्या सुरुवातीला गृहिणींना मोठा दिलासा देणारी एक बातमी आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडर १२० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तर अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत ५ रुपयांनी घट झाली आहे. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून तशी माहिती देण्यात आली आहे.
Price of non-subsidised LPG at Delhi will decrease by Rs.120.50 per cylinder with effect from 1st Jan 2019. As domestic LPG prices are subsidized by Government, Effective Price after subsidy to the consumer will reduce by Rs.5.91/cylinder.
— ANI (@ANI) December 31, 2018
अनुदानित सिलेंडरचे पूर्वीचे दर ५००.९० रुपये होते. ते कमी होऊन ४९४.९९ रुपये झाले आहेत. वर्षभरात १४.२ किलोचे १२ सिलिंडर ग्राहकाला उपलब्ध करून दिले जातात. डिसेंबर महिन्यात तब्बल दोनदा एलपीजी सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. आता १ जानेवारी २०१९ पासून ग्राहकांना नवीन दरांनुसार सिलेंडर उपलब्ध होणार आहेत. या वर्षांतील पेट्रोलच्या निचांकी दराचीही काही दिवसांपूर्वीच नोंद करण्यात आली आहे. आता घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दरही कमी झाल्यामुळे ग्राहकांना महागाईपासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.