नवी दिल्ली | अल-कायदा या दहशतवादी संघटनेचे भारतातील जाळे उद्ध्वस्त करण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून NIA मोठी कारवाई करण्यात आली आहे. NIA च्या पथकांनी पश्चिम बंगाल आणि केरळ येथे टाकलेल्या धाडीत अल-कायदाच्या नऊ दहशतवाद्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथे या धाडी टाकण्यात आल्या होत्या. यावेळी संबंधित दहशतवादी राहत असलेल्या ठिकाणी जिहादी साहित्य,
9 Al-Qaeda operatives arrested by NIA, in raids conducted at multiple locations in Murshidabad, West Bengal and Ernakulam, Kerala https://t.co/iSjTGukEbw
— ANI (@ANI) September 19, 2020
दहशतवाद्यांकडून डिजिटल उपकरणं, काही कागदपत्रं, जिहादी साहित्य, हत्यारं, देशी हत्यारं आणि स्फोटकं तयार करण्याची कागदपत्र आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार एनआयएला पश्चिम बंगाल आणि केरळसहित देशातील काही ठिकाणी अल कायदाच्या आंतरराज्यीय मॉड्यूल बाबत माहिती मिळाली होती. ही संघटना भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहितीही मिळाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.