HW News Marathi
देश / विदेश

रचला इतिहास ! निर्मला सीतारामन देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा काल (३० मे) शपथविधी पार पडला. यानंतर आज (३१ मे) मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. मोदींच्या सरकारमध्ये माजी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. देशाच्या इतिहासात दुसऱ्यांदा महिला अर्थमंत्री म्हणून सीताराम यांच्या नावाची नोंद झाली.

यापूर्वी इंदिरा गांधी १९७० ते १९७१ अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सांभाळला होता. मात्र सीताराम या देशातील पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. सुरुवातीच्या काळात सीतारामन या भाजपा प्रवक्त्या म्हणून देशासमोर आल्या. मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी चांगले काम पाहिले.

सीतारामन यांनी पदव्युत्तर अभ्यासात आंतरराष्ट्रीय व्यापार हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. अर्थशास्त्रात त्यांना गती असून त्यांचे भाषेवर प्रभुत्व आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वामध्ये एका महिलेला अर्थमंत्री केल्याचा परिणाम नक्कीच देशात पाहायला मिळणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विमानात मिळणार इंटरनेट, वायफाय

swarit

बाबरी प्रकरणाला २६ वर्षपुर्ण

News Desk

मुख्यमंत्री पलाणीस्वामींनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

News Desk