नवी दिल्ली । पंजाब नॅशनल बँकेला सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याची हाँगकाँगमधील २५० कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. ही मालमत्ता मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यातील कलम ५ अंतर्गत जप्त करण्यात आली आहे.
नीरव मोदीची परदेशात ४ हजार कोटींची मालमत्ता असल्याची माहिती ‘ईडी’ला मिळाली होती. त्यानंतर ही मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी हे पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. या दोघांनी मिळून पंजाब नॅशलन बँकेच्या मुंबईतील शाखेत काही कर्मचाऱ्यांच्या साथीने १३ हजार कोटींचा घोटाळा केला आणि ते देश सोडून फरार झाले आहेत.
ED attaches valuables worth Rs 255 Crores in Hong Kong under PMLA belonging to Nirav Modi. Total attachment in this PNB scam case till date is worth Rs 4744 crore. (file pic) pic.twitter.com/L5qbIOeDBA
— ANI (@ANI) October 25, 2018
या आधी ईडीने मोदींच्या ४ देशांतील ६३७ कोटींची संपत्ती जप्त केली होती. मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील मोदींचे २१६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली गेली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.