Site icon HW News Marathi

नितीश कुमार यांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री पदी विराजमान

मुंबई | नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुन्हा एकाद बिहारच्या ( Bihar) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आरजेडी-जेडीयू यांचे महागठबंधन असलेले सरकार बिहारमध्ये स्थापन झाले आहे. तर तेजस्वी यादव ( Tejashwi Yadav )हे बिहारचे उपमुख्यमत्री पदी विराजमान झाले आहेत. नितीश कुमार यांनी काल (9 ऑगस्ट) भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतर पुन्हा एकदा आरजेडी-जेडीयूसोबत घरोबा करत सरकार स्थापन केले आहे. नितीश कुमार हे आठ वेळा बिहारचे मुख्यमंत्री पदी विराजमान होणारी व्यक्ती आहे.

 

बिहारमधील महागठबंधनमध्ये सात पक्ष एकूण 164 आमदारांचा पाठिंब्याचे पत्र काल नितीश कुमारांनी सोपविले होते. यानंतर राज्यपालांनी आज नितीश कुमारांना शपथविधीसाठी आमंत्रित केले होते. गेल्या दोन वर्षापूर्वीच नितीश कुमार यांनी भाजपशी हात मिळवणी करत स्थापन केले आहे. या भेट घेऊन नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. “आम्ही एनडीएची साथ सोडली”, असे नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली.

 

Exit mobile version