HW News Marathi
देश / विदेश

व्याजदरात बदल नाही, रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर

मुंबई(वृत्तसंस्था): रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वषार्तील चौथे द्विमासिक पतधोरण बुधवारी जाहीर केले असून रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महागाईच्या दरात वाढ झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवले आहेत. गेल्या द्विमासिक पतधोरणात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली होती.

मात्र यंदाच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर कायम ठेवले जाण्याची चर्चा आधीपासूनच होती. मंगळवारपासून पतधोरण समितीच्या बैठकीला सुरुवात झाली होती. बुधवारी ही बैठक संपल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले. अपेक्षेनुसार पतधोरण समितीने रेपो दर कायम ठेवले आहे. यानुसार रेपो दर ६ टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्क्यांवर कायम आहे. विकासदर ६.७ टक्के इतका राहिल, असे अनुमान रिझर्व्ह बँकेने वर्तविले. यापूर्वी हाच अंदा ७.३ टक्के इतका वर्तविण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहा:कार

swarit

आंध्र प्रदेशमधील आजी-माजी आमदरांची गोळ्या झाडून हत्या

swarit

दीपिका कुमारी क्वार्टर फायनलमध्ये दाखल!

News Desk