HW News Marathi
देश / विदेश

देशातील इंधन दरवाढीला लगाम बसण्याची चिन्हे नाहीच

नवी दिल्ली | देशातील इंधन दरवाढीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. काल (बुधवारी) एका दिवसाच्या विश्रांती नंतर आज (गुरुवारी) २४ व्या दिवशी पुन्हा पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मुंबईतील आजची पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८९.६० तर डिझेलची किंमत प्रति लिटर ७८.४२ एवढी झाली आहे. मुंबईत आज (गुरुवारी) पेट्रोल ७ पैशांनी महागले आहे. देशातील या इंधन दरवाढीला लगाम बसण्याची कोणतीही चिन्हे अद्याप दिसत नाहीत.

दरम्यान, देशातील इतर बऱ्याच राज्यात अनेक ठिकाणी इंधनाच्या किंमतींनी नव्वदी पार केलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया दिवसेंदिवस घसरत चालल्याने तसेच कच्च्या तेलाचे भाव कडाडल्याने देशातील इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. केंद्र सरकारने इंधनाला देखील जीएसटीमध्ये समाविष्ट का केले नाही अशी विचारणा काँग्रेसकडून सतत केली जात आहे. तसेच इंधनावर मोठ्या प्रमाणात अधिभार लावल्याने इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

मोदी सरकारच्या कार्यकाळात वाढत असलेल्या महागाई विरोधात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी १० सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली होती. देशभऱातली २१ पक्षांनी या बंदला पाठिंबा देत आपला सहभाग आणि समर्थन दर्शविले होते. परंतु, याचा कोणताही परिणाम इंधन दरवाढीवर झालेला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भारतातील सगळ्यात ‘कमी’ वयाच्या मुलाला कोरोनाची लागण

swarit

अजित पवार म्हणतात ‘ते’ दुखणं कायमचं दूर करु, मुख्यमंत्र्यांसमोर दिला मोदींना शब्द

News Desk

मल्ल्याच्या प्रत्यार्पण आदेशावर स्वाक्षरी झाली, मात्र ‘ही’ आहे अडचण

News Desk
मनोरंजन

आता बाप्पा पण झाला सिंघम?

swarit

मुंबई । महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. दरवर्षी गणेशोत्सवात बाप्पाची वेगवेगळी रुपे पहायला मिळतात. यात काही नवल तर नाही, परंतु यंदा विले पार्ले पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या घरी पोलिसांच्या गणवेशातील म्हणजे “सिंघन” रुपी बाप्पाची प्रतिष्ठापणा केली आहे.

काणे यांनी ऐवढ्यावरच न थांबता त्यांनी चक्क सिंघम बाप्पाच्या भोवतीची सजावट म्हणून पोलीस स्टेशन उभारले आहे. या देखाव्यात “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” असे पोलिसांचे ब्रीदवाक्य लिहले आहे. हा सिंघम बाप्पा खुर्चीत ऐटीत बसलेला पाहायला मिळत आहे. काणे हे गेल्या वर्षीपासून पोलिसांच्या गणवेशातील बाप्पाची प्रतिष्ठापणा करत आहेत. या सिंघम बाप्पाला पाहण्यासाठी गणेश भक्ती मोठ्या संख्येने येत आहेत.

Related posts

लालबागचा राजा मंडळात झालेल्या धक्काबुकी प्रकरणी धर्मादाय आयुक्त डिगेंची चौकशी

News Desk

जावेद अख्तर यांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक

News Desk

मेघाची हिंदी बिगबॉसमध्ये मेगा एन्ट्री

Gauri Tilekar