HW News Marathi
देश / विदेश

आता व्हॉट्सअॅपवर सुद्धा जाहिराती ?

मुंबई | सोशल मीडियामधील मातब्बर असलेल्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मालकी मार्क झुकेरबर्ग यांच्याकडेच आहे. व्हॉट्सअॅप या अत्यंत लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया अॅपमध्ये कोणत्याही प्रकारच्या जाहिरातींचा मारा नसल्याने युझर्समध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. पण आपल्याला असलेली ‘ॲड फ्री’ सूट लवकरच संपुष्टात येणार आहे. आता नवीन वर्षाच्या सुरवातीलाच व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये जाहिराती दिसणार आहेत.

व्हॉट्सअॅपमध्ये असणाऱ्या प्रायव्हसीमुळे कंपनीकडून स्टेटस फीचरमध्ये जाहिरात देण्यास सुरवात करणार आहे. अशा पद्धतीचे फिचर यापूर्वीच इन्स्टाग्राममध्ये आहे. व्हॉट्सअॅपच्या स्टेटस फिचरमध्ये जाहिरातींची सुरवात अँड्रॉईड आणि ISO वर एकाचवेळी सुरु होणार आहे. आपल्याला स्टेटस फिचरमध्ये जाहिरात पाहावीच लागणार आहे. युझर्सना त्या जाहिराती बंद करण्याचा कोणताही पर्याय असणार नाही.

प्रसिद्ध व्हॉट्सअॅप न्यूज पोर्टल WAbetainfo ने ट्विटरवर पोल केला होता. या पोलमध्ये आपण स्टेटसमध्ये जाहीरात फिचर दिल्यानंतर व्हॉट्सअॅपचा वापर करणार का ? असा प्रश्न विचारला होता. यावर ६० लोकांनी व्हॉट्सअॅप वापरणार, असे मत व्यक्त केले, तर ४० टक्के लोकांनी व्हॉट्सअॅप सोडून देणार असल्याचे सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यातील सत्तांतरावर पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार

Aprna

श्रीनगरमध्ये जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक, संतप्त जमावाकडून दगडफेक

News Desk

“मोदींच्या वाराणसीतील सभेत काळ्या टोप्या आणि काळे मास्क उतरवण्यात आले, कलियुग म्हणतात ते हेच का?”

News Desk
देश / विदेश

अॅम्बी व्हॅलीवर बोली लावण्यास सुरुवा

News Desk

मुंबई : गुंतवणूदारांचे पैसे बुडविल्याप्रकरणी अनेक महिने तुरुंगात डांबण्यात आलेले सहारा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सुब्रातो रॉय यांना जोरदार हादरा बसला आहे. कारण त्यांच्या लोणावळा येथील अॅम्बी व्हॅलीचा लिलाव सुरू करण्यात आला आहे. ६७ हजार ६२१ एकरवरीलया संपूर्ण मालमत्तेची किंमत तब्बल ३४ हजार कोटी असून तसेच लिलावाची बोली ३७, ३९२ कोटीपासून सुरू झाली आहे.

मुंबई उच्च न्यायलयाने आजच अॅम्बी व्हॅलीसाठी लिलावाची नोटीस प्रसिद्ध केली. लिलावाला स्थगिती मागणारी याचिकागुरुवारी फेटाळून लावण्यात आली होती. दरम्यान, मॉरिशसमधील रॉयल पार्टनर्स इन्वेस्टमेंट फंड या कंपनीने अॅम्बी व्हॅलीमध्ये १० हजार ७०० कोटी रुपये गुंतवण्याची तयारी दर्शवली होती. तर सहारा समुहाच्या मते अॅम्बी व्हॅलीचे बाजारमूल्य १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता अॅम्बी व्हॅलीच्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related posts

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या सुरक्षेत वाढ, पुरोगामी विचारवंतांच्या सुरक्षेत केली वाढ

News Desk

कॉग्रेसने मोदी सरकारकडे केल्या ‘या’ १० मागण्या

swarit

काँग्रेसने आमचा प्रस्ताव नाकारला तर त्यांचं नुकसान होईल! – संजय राऊत

Aprna