HW News Marathi
देश / विदेश महाराष्ट्र

राज्यातील सत्तांतरावर पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार

मुंबई | राज्यातील सत्तांतरावर पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. राज्यातील सत्तांतर प्रकरण 14 फेब्रुवारीनंतर सुरू करू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज पार पडलेल्या सुनावणीत म्हटले. हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जाणार की नाही, यासंदर्भात न्यायालयाने आज (10 जानेवारी) कोणतीही टिप्पणी केलेली नाही. राज्यातील सत्तांतरावर 14 फेब्रुवारी ही तारख न्यायालयाकडून निश्चित झालेली आहे. यामुळे आता 14 फेब्रुवारीला काय होणार, हे पाहाणे महत्वाचे ठरेल.

या प्रकरणावर न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली होती. तेव्हा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी नबाम रेबिया केसवर काही वादविवाद करायचे आहे, असे न्यायालयात म्हटले. आणि हे प्रकरण 7 न्यायमूर्तीच्या पीठाकडे का?, जावे, यासंदर्भातील मुद्दे मांडायचे आहेत, असे कपिल सिब्बल यांनी न्यायालया सुनावणीदरम्यान म्हटले.  तसेच शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी देखील न्यायालयात म्हटले की, हे प्रकरण पुढे किती वेळी चालू ठेवायचे यासंदर्भात तातडीने विचार करावा. यावर सर न्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “14 फेब्रुवारीला आम्ही महाराष्ट्राच्या सत्तांतरावर सुनावणी घेऊ.”

यानंतर राज्यातील सत्तांतर प्रकरणाबाबत न्यायाधीशांमध्ये तारखांसदर्भात चर्चा झाली. आणि 14 फेब्रुवारीनंतर आपण हे प्रकरण सुरू करू शकतो, असे सरन्यायाधीश धनजंय चंद्रचूड यांनी म्हटले. राज्यातील सत्तांतर प्रकरण आता अजून एका महिन्याने लांबले आहे. 14 फेब्रुवारीनंतर सत्तांतरावर सलग सुनावणीची शकता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या

राज्यातील सत्तांतर प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे सर्वोच्च न्यायालय पाठविणार? सर्वांचे लक्ष

राज्यातील सत्तांतरावर 10 जानेवारीला सुनावणी होणार

Related posts

कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत,अजित पवारांचा निलेश राणेंना सणसणीत टोला!

News Desk

मुंबईत मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू, ७ जखमी

News Desk

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार; रुग्णालयात दाखल

Aprna