HW Marathi
देश / विदेश

आता फक्त १५३ रुपयात पाहा टीव्ही चॅनेल्स

नवी दिल्ली | केबल आणि डीटीएच टीव्ही पाहणाऱ्या ग्राहकांचाखर्च पुढील महिन्यापासून कमी होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (टीआरएआय)च्या आदेशानुसार प्रेक्षकांना १५३ रुपये(जीएसटी सहित) प्रति महिन्याला खर्च करून १०० पेड चॅनल्स आणि इतर मोफत चॅनल्स पाहता येणार आहेत. टीआरएआयने  ग्राहकांना ३१ जानेवारीपूर्वीच संबंधित १०० चॅनल्स निवडण्याची संधी दिली आहे. १ फेब्रुवारीपासून नवीन नियम लागू होणार आहेत.

सर्व टीव्ही चॅनल्स ग्राहकांना मोबाईलद्वारे एसएमएस पाठवून याची माहिती देण्यात येणार आहे. टीआरएआयने जारी केलेल्या दोन टेलिफोन नंबर आणि ईमेल आयडीच्या माध्यमातूनही आपल्याला यासंदर्भात माहिती मिळू शकते. टीआरएआयच्या माहितीनुसार, बेसिक पॅकमध्ये एचडी चॅनल्सचा समावेश नाही. एखादा एचडी चॅनल्स हा दोन एसडी चॅनल्सच्या किंमतीच्या बरोबरीचा असेल.

ग्राहक ०११-२३२३७९२२ (ए.के. भारद्वाज) आणि ०११-२३२२०२०९ (अरविंद कुमार) या नंबरवर कॉल करून किंवा advbcs-2@trai.gov.in या arvind@gove.in या ईमेल आयडीवर मेल करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. एका चॅनल्ससाठी ० ते जास्तीत जास्त १९ रुपये मोजावे लागणार आहेत. चॅनल्स वेगवेगळ्या स्वरूपातही आपण निवडू शकता. नवी यंत्रणा सुरुवातीला २९ डिसेंबर २०१८ रोजी लागू होणार होती.

 

Related posts

2 इंचांमुळे असे काही घडले, त्याला पाच लाख मोजावे लागले

News Desk

गुगलमुळे हत्येच्या कटातून सुटका

News Desk

आमचे नाते पवित्र-हनीप्रती ३८ दिवसांनी अवतरली

News Desk