नवी दिल्ली | जोपर्यंत राफेल करार खरेदी प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे तोपर्यंत राफेल कराराच्या किमतींबाबत सार्वजनिकरित्या चर्चा करण्यात येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालायने सांगितले आहे. त्याचप्रमाणे जेव्हा राफेलच्या किमती सार्वजनिक केल्या जातील तेव्हाच यावर सार्वजनिकरित्या चर्चा होऊ शकते. केंद्र सरकारने सोमवारी (१२ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात राफेल विमान खरेदी प्रकरणी शपथपत्र सादर केले होते. या शपथपत्रातून केंद्राने राफेल विमान खरेदी प्रक्रियेची माहिती सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केली होती. या प्रकरणी आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठासमोर राफेल करार प्रकरणी सुनावणी सुरु आहे.
Rafale Jet Deal Case: AG KK Venugopal appearing for the Centre says, pricing details have been given in a sealed cover but there are factors like inter governmental agreement which barred its disclosure.
— ANI (@ANI) November 14, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.