HW Marathi
देश / विदेश

आता सागरी मार्गाने देशात शिरण्यासाठी दहशवाद्यांचे प्रशिक्षण सुरू !

नवी दिल्ली | “भारतात अशांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका देशाकडून मिळणाऱ्या साहाय्याच्या जोरावर कट्टरतावाद्यांनी पुलवामा हल्ला घडवून आणला”, असे म्हणत नौसेना प्रमुख सुनील लांबा यांनी नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. आता दहशतवाद्यांकडून सागरी मार्गाचा अवलंब करून देशात शिरण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देखील दिले जात असल्याची माहिती मिळाल्याचे देखील सुनील लांबा यांनी यावेळी म्हटले आहे.

मुंबई झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी सागरी मार्गानेच भारतात प्रवेश केला होता. “आता जगात नव्या प्रकारचा दहशतवाद दिसून येत आहे. जगातील काही मोजकेच देश या दहशतवादापासून आपला बचाव करण्यास यशस्वी ठरले आहेत. दहशतवादाचे हे नवे रुप आणि त्याचे परिणाम चिंताजनक आहेत”, असे सुनील लांबा यावेळी म्हणाले आहेत. हिंदी-पॅसिफिक विभाग संवाद कार्यक्रमात सुनील लांबा बोलत होते.

Related posts

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कर्णन यांच्या अटकेचे सर्वोच न्यायालयाचे आदेश 

News Desk

Rafale deal :  ‘देश का चौकीदार चोर हैं’ | राहुल गांधी

अपर्णा गोतपागर

मी नव्हे तर ‘तो’ नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र असेल !

News Desk