HW News Marathi
देश / विदेश

न्यायाधीश शरद बोबडेनंतर एन.व्ही रमण होणार सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश

नवी दिल्ली | भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे हे २३ एप्रिलला निवृत्त होणार आहेत. न्यायाधीश बोबडे हे भारताचे ४७ वे सरन्यायाधीश असून आता ४८ वे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण होणार अशी चर्चा होती. तर नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केंद्राकडे केली आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाल पुढील महिन्यात संपणार असून त्यामुळे केंद्र सरकारने नूतन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली होती. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सरन्यायाधीश पदासाठी नवे नाव सूचवण्याची सूचना न्यायाधीश बोबडे यांना करण्यात आली होती. तर यासंदर्भात पत्र केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सरन्यायाधीश बोबडे यांना पाठवलं होतं.

सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपदी सर्वात अधिक अनुभव असलेल्या न्यायमूर्तींची नेमणूक केली जाते. सध्या न्या. बोबडे यांच्यानंतर एन.व्ही. रमण हे सर्वाधिक ज्येष्ठ न्यायमूर्ती असून, आहेत. न्या. बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून एन.व्ही. रमण यांच्या नावाची शिफारस केंद्राकडे केली आहे.

दरम्यान, एन.व्ही. रमण यांचं वय ६४ वर्ष आहे. रमण यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पोन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला आहे. पोन्नावरम हे गाव कृष्णा जिल्ह्यात येते. रमण यांनी १० फेब्रुवारी १९८३ सालापासून आपल्या वकिलीला सुरूवात केली. न्यायमूर्ती रमण यांचं B.Sc., B.L. शिक्षण झालेलं असून, संविधान आणि फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये रमण यांनी स्पेशलायझेशन ही केलेलं आहे.

शरद बोबडेंची नियुक्ती कोणी केलेली?

न्यायाधीश रंजन गोगोई यांनी सुमारे १३ महिन्यांच्या कारकिर्दीची ऐतिहासिक अयोध्या निकालाने सांगता केली होती. गोगोई यांनीच आपले उत्तराधिकारी म्हणून न्या. बोबडे यांच्या नावाची शिफारस महिनाभरापूर्वी केली होती. त्यानुसार ३० ऑक्टोबर 2019 रोजी राष्ट्रपतींनी न्या. बोबडे यांची १८ नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपूत्र शरद अरविंद बोबडे यांनी १८ नोव्हेंबर२०१९ ला सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतली होती. ते भारताचे ४७ वे सरन्यायाधीश ठरले होते. न्या. बी. पी. गजेंद्रगडकर व न्या. यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर न्यायसंस्थेतील या सर्वोच्च पदाचा मान महाराष्ट्राला तिसऱ्यांदा मिळाला होता. आता येत्या २३ एप्रिलला न्यायमूर्ती शरद बोबडे निवृत्त होत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरेंचा मोदींना पाठिंबा

News Desk

आलोक वर्मा यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा

News Desk

राजीव गांधी यांच्यामुळेच मी आज जिवंत | अटलबिहारी वाजपेयी

News Desk