HW News Marathi
देश / विदेश

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या

टोकियो | जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. शिंजो आबे यांनी वयाच्या ६४ वर्षी अखेरचा श्वास घेतला. शिंजो आबे यांच्यावर जपानच्या नारा शहरात त्यांच्यावर गोळी झाडल्याची घटना घडल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. यानंतर शिंजो आबेंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान शिंजो आबे यांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. शिंजो आबेच्या अशा अचानक जाण्याने जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिंजो आबे हे नारा शहरात भाषण देत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळी झाडली. यानंतर शिंजो आबे स्टेजवर कोसळले. शिंजो आबे अचानक कोसळल्याने सर्वत्र खळबळ माजली. या हल्ल्यानंतर शिंजो आबे यांना रुग्णालयात नेण्यात आले. आता शिंजो आबे यांच्यावर रुग्णालय उपचार सुरू आहे. यानंतर जापानच्या पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. जपान पोलिसांनी ताब्यात घेतलेला हल्लेखोराकडून बंदूक जप्त करण्यात आली असून या हल्लेखोराचे वय ४० वर्षा आहे.
शिंजो आबे यांचे भारताशी घनिष्ट संबंध आहेत.  शिंजोंनी त्यांच्या पंतप्रधानच्या काळात चार वेळा भारताला भेट दिली. शिजो आबेंनी आजारपणामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिंजो आबे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. शिंजो आबेच्या निधनाचे बातमी कळताच पंतप्रधानांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला असून उद्या (९ जुलै) देशभरात एक दिवसीय तुखवटा जाहीर केला आहे.

  संबंधित बातम्या
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पतीला व्हिडीओ कॉल करून मॉडेलची आत्महत्या

News Desk

दोन्ही PA अटकेत, आता अनिल देशमुखांवरही टांगती तलवार

News Desk

अमेरिकेत पंतप्रधान मोदींचा नारा ‘अब की बार ट्रम्प सरकार’

News Desk