HW Marathi
देश / विदेश

पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक

पुणे | पुलवामा हल्ल्या प्रकरणी पुण्याच्या चाकणमधून एकाला अटक करण्यात आली आहे. बिहार एटीएसचने ही कारवाई आज (२८ मार्च) एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव शरियत मंडल असे आहे. तर तर बिहारमधील पाटणा जंक्शन येथे एटीएसने खैरूल मंडल आणि अबू सुलतान या दोघा बांगलादेशींना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान शरियतचे नाव पुढे आले. त्यानंतर बिहार एटीएसने पुणे एटीएसच्या मदतीने चाकण पट्ट्यात छापा मारून शरियत याला अटक करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.  तब्बल २०० किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा चुराडा झाला.  त्यानंतर भारतानं पाकमध्ये घुसून एअर स्ट्राइक करत २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

 

 

 

 

Related posts

विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक, काही वेळातच जामीन मंजूर

News Desk

…तर दाऊद इब्राहिम, सईद सलाउद्दीनला भारताच्या ताब्यात द्या !

News Desk

कुलभूषण जाधव प्रकरणी ‘आयसीजे’ करणार फेब्रुवारीत अंतिम सुनावणी 

अपर्णा गोतपागर