HW News Marathi
देश / विदेश

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला, एक जवान जखमी

श्रीनगर | श्रीनगर-जम्मू महामार्गावर बनीहाल येथे सीआरपीएफवर आज (३० मार्च) ताफा जात असताना कारमध्ये स्फोट सॅन्ट्रो कारमध्ये स्फोट झाला. ही घटना ताजी असतानाच आता पुलवामा येथे स्टेट बँकेजवळील सीआरपीएफच्या बंकरवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले असून त्या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्याजवळ आज (३० मार्च) एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला आहे. सीआरपीएफ ताफा तेथून जात असताना कारमध्ये स्फोट झाला. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या माहितीनुसार, सॅन्ट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. परंतु सीआरपीएफच्या गाडीचे नुकसान झाले आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तरुणाची शहीदांना ‘ही’ अनोखी श्रद्धांजली

News Desk

गुजरातमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का !

News Desk

लष्कराची मोठी कारवाई; 8 दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk