HW News Marathi
देश / विदेश

चेन्नई सुपरकिंग्ज संघातील गोलंदाज आणि स्टाफमधील इतर १२ जणांना कोरोनाची लागण

मुंबई | आयपीएल सुरू होण्याआधी बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक गोलंदाज आणि स्पोर्ट स्टाफमधील १२ जणांना कोरोनाची  लगा झाली आहे. कोरोनाची लागण झालेले चेन्नईच्या संघातील सर्व सदस्यांची तब्येत स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. बीसीसीआयने युएईत दाखल झाल्यानंतर सर्व संघांना मार्गदर्शक तत्वे आखून दिली होती.

दुबईत दाखल झालेल्या चेन्नईच्या खेळाडूंनी नियमाप्रमाणे आपला ६ दिवसांचा क्वारंटाइन काळ पूर्ण केला आहे. परंतू संघातील सदस्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे चेन्नईच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केलेली नाही. राजस्थान, पंजाब यासारख्या संघांनी आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे. दुबईत दाखल झाल्या-झाल्या सर्व खेळाडू आणि स्पोर्ट स्टाफची कोरोचा चाचणी करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साइटच्या प्रस्तावित लिलावास आदित्य ठाकरेंचा विरोध

News Desk

23 वर्षांपासून ती राखतेय नखांची निगा…

News Desk

‘किंगमेकर’ भगतसिंह कोश्यारींच्या शब्दांचा मंत्रिमंडळ फेररचनेत ठसा 

News Desk