HW Marathi
देश / विदेश

विरोधी पक्षांनी कमांडर अभिनंदन प्रकरणी षडयंत्र रचले, पंतप्रधान मोदींचा आरोप

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. “भारताची अशी मागणी आहे कि पाकिस्तानने दहशतवाद संपवावा. पाकिस्तानने इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस मिळालेल्या दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात द्यावे. त्याचप्रमाणे २६/११ च्या हल्ल्यातील दोषींना देखील पाकिस्तानने आमच्या ताब्यात द्यावे”, अशी मागणी पंतप्रधान मोदी यांनी एका हिंदी वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत बोलताना केली आहे.

“आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर शंका घेणाऱ्यांना, पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे कौतुक करणाऱ्यांना आपण ओळखले पाहिजे. कमांडर अभिनंदन जेव्हा पाकिस्तानमध्ये होते तेव्हा विरोधी पक्षांनी अभिनंदन प्रकरणी षडयंत्र रचले. विरोधी पक्षांनी कमांडर अभिनंदन प्रकरणाचे देखील राजकारण केले. मी पाकिस्तानच्या कटात फसू इच्छित होत नाही”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Related posts

पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदीदरम्यान ४ संशयित ताब्यात

News Desk

दिल्ली उच्च न्यायालयाने सज्जन कुमारची याचिका फेटाळली

News Desk

अलास्कात ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

News Desk