श्रीनगर | नववर्षापूर्वीच भारतात घुसून दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे. रविवारी(३० डिसेंबर) नौगाम सेक्टरमध्ये एलओसी या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (BAT) च्या कारवायांना सुरुंग लावताना दोन घुसखोरांचा खात्मा करण्यात यश आले आहे. लष्कराने मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
Indian Army: Foiled a major BAT(Border Action Team) attempt to strike a forward post along LoC in Naugam Sector on 30 December.Intruders attempted to move by exploiting thick jungles close to LoC &were assisted by heavy covering fire of high calibre weapons from Pakistani posts pic.twitter.com/wKfOweHzuZ
— ANI (@ANI) December 31, 2018
पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (BAT)चे पथक मोठ्या प्रमाणात दारुगोळा घेऊन भारताच्या नियंत्रण रेषेवरील जंगलात येत आहेत. त्यांना कव्हर करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात येत आहे. एएनआयनकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी भारतीय लष्कराने पाकिस्तानी BAT पथकाचा हल्ला परतवून लावला. तसेच या कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या दोन जवानांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आळा आहे.
Army: Intruders were wearing combat dresses like Pakistani regulars and were carrying stores with Pakistani markings. Some were also seen in BSF and old pattern IA dresses. From the recovery, it was estimated that they intended to carry out a gruesome attack on the Indian Army https://t.co/HuMoLrBJqj
— ANI (@ANI) December 31, 2018
लष्कराने खात्मा केलेल्या घुसखोरांनी बीएसएफचे जुने लष्करी गणवेश परिधान केले होते. तसेच या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात सामना होते. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले सामान पाहता ते भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्याच्या निर्णयाने आले होते, हे स्पष्ट होते, असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.