HW News Marathi
देश / विदेश

अमेरिकेतील विमानतळावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा अपमान

वॉशिंग्टन | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आज (२१ जुलै) तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. इम्रान खान वॉशिंग्टनमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर अमेरिका सरकारकडून कुणीही आलेले नव्हते. पंतप्रधान पदी विराजमान झाल्यानंतर इम्रान खान यांचा हा पहिला अमेरिका दौरा आहे. इम्रान खान आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.

या दौर्‍यात इमरान खान यांची अमेरिकेचे राष्‍ट्रपती डोनाल्‍ड ट्रम्‍प यांच्यासोबत चर्चा होणार आहे. दोन्ही देशांमध्ये रक्षा, व्यापार आणि कर्ज अशा अनेक मुद्‍यांवर चर्चा होण्‍याची शक्‍यता आहे. ट्रम्प यांनी वेळोवेळी पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. इम्रान खान यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका दौऱ्याचे निमंत्रण दिले आहे. सोमवारी (२२ जुलै) दोन्ही नेते एकत्र जेवणही करणार आहेत. यानंतर दोन्ही नेत्‍यांमध्ये बैठक होणार आहे.

यानंतर इम्रान खान यांच्यासोबत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनेट जरल फैज हमीद अमेरिकेला गेले आहेत. अमेरिकेत दाखल झाल्यावर इमरान यांना अमेरिकेतील पाकिस्‍तानचे राजदूत अजद मजीद खान यांच्या निवासस्‍थानी थांबल्याची माहिती मिळाली आहे. विमानतळावर त्‍यांच्या स्‍वागतासाठी विदेश मंत्री शाह महमूद कुरेशी उपस्‍थित होते. यावेळी मुळच्या पाकिस्‍तानी असलेल्‍या अनेक लोकांनी त्‍यांचे स्‍वागत केले. याआधी पाकिस्‍तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी २०१५ साली अमेरिकेचा दौरा केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, लोकसभेत भाजपची मागणी

News Desk

Union Budget 2021 |  भारतात पहिल्यांदाच डिजीटल जनगणना केली जाणार

News Desk

राज ठाकरे यांची मागणी चुकीची | लोकजनशक्ती पार्टी

News Desk