इस्लामाबाद। पाकिस्तानची हवाई हद्द भारतासाठी संपूर्ण बंद करण्याच्या हालचाली पाकिस्तानात सुरू झाल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीच ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. याबरोबरच भारत व अफगाणिस्तान यांच्यातील व्यापारासाठी वापरला जाणारा पाकिस्तानचा भूमार्गही पाकिस्तान रोखणार आहे. हे दोन्ही निर्णय इम्रान यांच्यासमवेत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याचे इम्रान म्हटले आहे.
दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर औपचारिकता पूर्ण करणे बाकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. पाकिस्ताने काश्मीरजा मुद्दा जेवून आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडला. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडल्यामुळे इम्रानने या नैराश्यातूनच पाकिस्तानने भारतासाठी हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Pakistan Minister Fawad Chaudhry tweets,'Pakistan Prime Minister Imran Khan is considering complete closure of air space to India.' pic.twitter.com/NowUYDDTKl
— ANI (@ANI) August 27, 2019
यासंदरभातील ट्वीट जे सुरू केले आहे, त्याचा शेवट आम्ही करू, असे ट्विट पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी केले आहे. यापूर्वी पाकिस्तानने बालाकोट येथील जैशच्या तळावर भारतीय हवाई दलाने हल्ला केल्यानंतर आपली हवाई हद्द भारतासाठी बंद केली होती. त्यानंतर १६ जून रोजी ही हद्द पुन्हा खुली करण्यात आली. भारताबरोबरचा व्यापारही पाकिस्तानने थांबवला असून, दोन्ही देशांदरम्यानची बस व रेल्वेसेवाही स्थगित केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.