HW News Marathi
देश / विदेश

‘अडीच लाख’ ग्रामपंचायती वायफायने जोडणार | मनोज सिन्हा

नवी दिल्ली | ‘संसद आदर्श ग्राम योजना’ अंतर्गत लोकसभा सदस्यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये जवळपास २५००० मोफत ‘वायफाय’ची सुविधा देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केल्याची माहिती संप्रेषणमंत्री मनोज सिन्हा यांनी बुधवारी लोकसभेत दिली. लोकसभा सदस्यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये जवळपास २५००० वायफाय हॉटस्पॉट स्थापन करण्यात येणार आहेत. ‘भारतीय संचार निगम लिमिटेड’ तर्फे ही सेवा पुरविण्यात येणार आहे.

तसेच ही सेवा यशस्वी झाल्यानंतर भविष्यात इतरही टेलीकॉम कंपन्यांच्या सेवेचा लाभ घेता येणार असल्याचे ते म्हणाले. भारत नेट प्रकल्पांतर्गत भारतातील अडीच लाख ग्राम पंचायतींना ऑप्टीकल फायबर लिमिटेडमार्फत एकमेकांशी जोडण्याचे सरकारचे ध्येय आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत डिजिटल भारत कार्यक्रमांतर्गत दीड लाख ग्राम पंचायती जोडल्या गेल्या आहेत आणि मार्च २०१९ पर्यंत अतिरिक्त एक लाख ग्राम पंचायती जोडण्याचे सरकारचे ध्येय आहे.

हाय स्पीड इंटरनेटच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येणार आहे. १५ जुलै पर्यंत १ लाख १३ हजार पंचायती जोडण्यात आल्याची माहिती सिन्हा यांनी दिली आहे. यामुळे नफा मिळविण्यासाठी सुरुवातीला बीएसएनएल तर्फे सेवा पुरविण्यात येत आहे का ? असा प्रश्न सर्वच स्तरातून उपस्थित होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

 मुंबई विमातळावर भारतीय हवाई दलाचे मालवाहक विमान धावपट्टीवरून घसरले

News Desk

हजारो आंदोलक शेतकऱ्यांनी तोडले पोलिसांचे बॅरिकेट्स, दिल्लीत तणाव वाढला

News Desk

…तर पाकिस्तानला ओसाड बनवू, नितीन गडकरींचा इशारा

News Desk
देश / विदेश

पश्चिम बंगालचे नाव ‘बांगला’ विधेयकाला मंजुरी

swarit

कोलकाता | पश्चिम बंगालचे नाव बांगला असे नामकरण लवकरच होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत नामकरणाचे विधेयक गुरुवारी मंजूर करून झाले आहे.

पश्चिम बंगालचे नाव बदलण्याचे कारण म्हणजे वर्णमालेनुसार पश्चिम बंगालच नाव हे सर्वात खाली येते. त्यामुळे वर्णमाला क्रमात राज्याचे नाववर यावे. यासाठी ममता बॅनर्जी सरकारने हा निर्णय घेतला होता. विधानसभेतील विधेयक मंजूर झाल्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे.

गृहमंत्रालयाने मंजुरी दिल्यास पश्चिम बंगालचे बांगला असे नामाकरण होईल. २०१६ रोजी देखील पश्चिम बंगालचे नाव बदलून बांगला करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु केंद्र सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता.

Related posts

छत्रपती शिवरायांसारखा महामानव हजारो वर्षात एकदाच जन्म घेतो !

News Desk

जर फ्रान्स-जर्मनी शांततेत जगू शकतात तर भारत-पाकिस्तान का नाही ?

News Desk

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून

News Desk