नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत भोपाळ मतदार संघातून भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना काल (१७ एप्रिल) उमेदवारी देण्यात आली. परंतु साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यात येऊ नये, असा सवाल उपस्थित करत मालेगाव बॉम्ब स्फोटातील पीडिताच्या वडिलांनी प्रज्ञा सिंहा यांच्या विरोधात एनआयए न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Father of a victim in Malegaon blast has filed application against Sadhvi Pragya Thakur after she was declared BJP candidate from Bhopal. Application has questioned her candidature before NIA court citing her health which was one of the reasons in her bail application pic.twitter.com/fvaR6bUx3o
— ANI (@ANI) April 18, 2019
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उमेदवारी मिळण्यापूर्वी तब्येतीचे कारण पुढे करत एनआयए न्यायालयाकडून जामीन मिळला आहे. यानंतर त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. नासीर अहमद सय्यद बिलाल यांनी ही याचिका दाखल केली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी निवडणूक लढण्यास तयार असून या कामाला सुरुवात देखील केली आहे.
भोपाळ मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार आलोक सांजर यांनी ७.१४ लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी.सी.शर्मा यांनी ३.४३ लाख मते मिळाली होती. परंतु यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे. तर भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.