HW News Marathi
देश / विदेश

भारताकडून इतर देशांना स्वस्त दरात पेट्रोल विक्री

नवी दिल्ली | गेल्या कित्येक महिन्यांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असताना आता माहिती अधिकारात एक धक्कादायक बाब समोर येत आहे. भारतात इंधन दरवाढीने उच्चांक गाठलेला असताना आपण इतर देशांना स्वस्त दरात पेट्रोल आणि डिझेलची विक्री करतो, अशी माहिती मिळत आहे. तसेच देशात आज पुन्हा पेट्रोलच्या किंमतीत २० पैसे तर डिझेलच्या दरात २१ पैशांची वाढ झाली आहे. आरटीआय कार्यकर्ता रोहित सभरवाल याने एका सरकारी कंपनीकडून ही माहिती मागवली होती.

इतर देशांना या दरात इंधनाची विक्री

मॉरिशिअस आणि मलेशिया या देशांमध्ये यापेक्षा निम्म्या किंमतीत विकले जाते. आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, भारत मॉरिशिअसला पेट्रोल ३६ रुपये ३० पैसे दराने तर डिझेल ३७ रुपये ०६ पैसे दराने, मलेशियाला ३६ रुपये ८ पैसे दराने पेट्रोल विकले जाते. याशिवाय हाँगकाँगला ३८ रुपये २६ पैसे आणि सिंगापूरला ३८ रूपये ३१ पैसे दराने पेट्रोल दिले जाते.

दरम्यान, “ गेल्या काही महिन्यांत इंधनाच्या किंमतीत वेगाने बदल होत आहेत. दर सतत कमी जास्त होत आहे. अशा परिस्थितीत कोणताही निर्णय घेण्याची घाई करणे गरजेचे नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कपड्याच्या कारखान्याला भीषण आग, ४ जणांचा मृत्यू

swarit

#MeToo : मला भीती दाखवून माझ्याशी संबंध प्रस्थापित केले !

Gauri Tilekar

भूपेन हजारीकांच्या कुटुंबीयांचा ‘भारतरत्न’ स्वीकारण्यास नकार

News Desk