भोजपूर | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राज्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आरा शहरामध्ये एका महिलेला काही लोकांनी मारहाण करून तिला निर्वस्त्र फिरवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर नितीश कुमार यांच्या सरकारची पोल खोल झाली आहे.
एका युवकाच्या हत्येच्या संशयावरून या महिलेला मारहाण केली असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ग्रामस्थांनी गावातील काही दुकानांना आग लावली. या घटनेनंतर बिहारमध्ये कायद्या सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. या घटनेनंतर विरोधकांनी नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
#EarlierVisuals: Eight police personnel, including SHO (Station house officer) Bihiya, have been suspended in connection with the incident where a man was found dead in Bhojpur's Bihiya&a woman was allegedly stripped & thrashed on suspicion of being involved in the murder. #Bihar pic.twitter.com/LzlXAYO77r
— ANI (@ANI) August 20, 2018
काय आहे ही घटना
बिहारचे एडीजी एस के सिंघल यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे दामोदरपूर येथील रहिवासी विमलेश शहा (१९) नावाच्या युवकाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला होता. या घटनेनंतर दामोदरपुरातील ग्रामस्थांना वाटले की, कामाठी पुरात राहणाऱ्या लोकांनी गळा दाबून त्याला ठार केले. त्यानंतर विमलेशचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकून दिला, असे ग्रामस्थांना वाटले. विमलेशचा मृतदेह पाहून दामोदरपुरातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत गावातील दुकानांना आग लावली. ग्रामस्थ एवढ्यावरच थांबले नाहीत. तर गावातील एका महिलेला पकडून तिचे कपडे फाडले आणि तिला पूर्ण बाजारात निर्वस्त्र फिरवून ग्रामस्थांनी मारले. भडकलेल्या ग्रामस्थांनी ट्रेनवर देखील दगड फेकून राग व्यक्त केला.
Body of a man was found near Bihiya railway track & locals accused residents of a house in a nearby red light area of murdering him: SK Singhal, ADG (police headquarters) on woman stripped & thrashed on suspicion of being involved in murder of a man in Bhojpur yesterday. #Bihar pic.twitter.com/PUtUf6hgUc
— ANI (@ANI) August 21, 2018
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून आक्रमक झालेल्या ग्रामस्थांना शांत करण्यासाठी हवेत गोळीबार केला. या घटनेत पोलिसांनी एकूण १३ जणांना अटक केली आहे. यात आरजेडीच्या नेत्याचा देखील समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबाबत पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे एसएचओसह आठ पोलीस कर्मचाऱ्यांना सस्पेंड केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.