राजस्थान | सचिन पायलट यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष क्षणात अधिक आक्रमक झाला आहे. याआधी उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपद काढून घेतल्यानंतर आता काँग्रेसने पायलट यांना नोटीस पाठवली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पायलट यांनी पक्षांच्या बैठकीकडे पाठ फिरवली. काॅंग्रेसने बोलावलेल्या विधीमंडळ पक्ष बैठकांना गैरहजर राहिल्याने सचिन पायलट यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
सचिन पायलट यांच्यासह बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या १८ जणांनादेखील काॅंग्रेसने नोटीस पाठवली पाठवण्यात आली असून दोन दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आल आहे. अन्यथा विधिमंडळ पक्षाचं सदस्यत्व रद्द केलं जाणार आहे. राजस्थानमधील काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी ही माहिती दिली आहे.राजस्थान विधीमंडळाच्या अध्यक्षांनी देखील पायलट यांना नोटीस पाठवली असून १७ जुलैपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. पायलट यांनी १७ जुलैपर्यंत उत्तर दिले नाही तर त्यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.
Notice issued to Sachin Pilot&18 other party members, for not attending Congress Legislative Party meetings. If they don't respond within 2 days, then it will be considered that they are withdrawing their membership from CLP: Rajasthan Congress in-charge Avinash Pande. (File pic) pic.twitter.com/TJ8ShxasgX
— ANI (@ANI) July 15, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.