कोलंबो | श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला एक मोठा धक्का लागला आहे. भारताचा ऑलराऊंडर कृणाल पांड्या याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे आज (२७ जुलै) होणारी दुसरी टी-20 पुढे ढकलण्यात आली आहे. टीममधल्या इतर खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तर हा सामना बुधवारी होणार असल्याचं सांगितलं आहे. कृणाल पांड्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे दुसरी टी-20 पुढे ढकलण्यात आली आहे.
Ind vs SL: Krunal Pandya tests positive for COVID-19, second T20I postponed
Read @ANI Story | https://t.co/5gYImrPKrT#INDvsSL pic.twitter.com/0dBmYAuPxp
— ANI Digital (@ani_digital) July 27, 2021
कृणाल पांड्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांच्या इंग्लंड दौऱ्यावर जाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सोमवारीच बीसीसीआयने सूर्यकुमार आणि पृथ्वी श्रीलंका दौऱ्यानंतर इंग्लंडला रवाना होतील, असं सांगितलं होतं. शुभमन गिल, आवेश खानआणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाल्यामुळे हे दोघांची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.
NEWS : Krunal Pandya tests positive.
Second Sri Lanka-India T20I postponed to July 28.
The entire contingent is undergoing RT-PCR tests today to ascertain any further outbreak in the squad.#SLvIND
— BCCI (@BCCI) July 27, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.