HW News Marathi
देश / विदेश

स्टॅच्यू ऑफ युनिटीचे मोदींच्या हस्ते अनावरण

नवी दिल्ली | सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्ताने ऐक्याचे प्रतीक (स्टॅच्यू ऑफ युनिटी) यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. या समारंभाला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच अनेक नेते उपस्थित आहेत. नर्मदा जिल्ह्यातील १८२ मीटर उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. २०१३मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना या पुतळ्याचे कामाला सुरुवात झाली होती. या पुतळ्यासाठी जवळपास २,९८९ कोटींचा खर्च आला आहे. मोदींचा हा ड्रीम प्रॉजेक्ट असल्याचे म्हटले जाते.

https://www.facebook.com/hwmarathi/videos/719641155100905/

स्टॅच्यू ऑफ युनिटी कुठे बांधण्यात आले

ही देशातील सर्वाच उंचीचा पुतळा वडदोरा जिल्ह्यातील नर्मदा नदी पात्रात बांधण्यात आले आहे. हे कावाडिया कॉलोनी गावाजवळ बांधण्यात आले आहे. या पुतळ्याची उंची ६०० फुट तर १८२ मीटर उंचीचा असून स्टॅच्यू ऑफ युनिटी सात किलोमीटर उंचीपासून दिसतो. लॉर्सन अॅन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचालित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती.

स्टॅच्यू ऑफ युनिटीची खासियत

या पुतळ्यासाठी जवळपास २,९८९ कोटींचा खर्च आला आहे. या पुतळ्यासाठी देशातील शेतकऱ्यांनी लोखंड दिले असून हा पुतळ्यात लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून हा पुतळा तयार करण्यात आला आहे. या पुतळ्यात १८,५०० टन रेनफोर्स स्टील, ६,५०० टन स्ट्रक्चरल स्टील, १,७०० टन आणि धातूंचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ साठी वापर करण्यात आला आहे. कंप अथवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे नुकसान होणार नाही अशापद्धतीने संरचना करण्यात आली आहे. पुतळा तयार करण्यासाठी तब्बल दोन कोटी २५ लाख किलो सिमेंटचा वापर करण्यात आला आहे

जगातील सर्वात उंच

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वात उंच पुतळा असून तो कमी वेळेत तयार करण्यात आला आहे. पुतळ्याची उंची ही न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच चीनमधील गौतम बुद्धांच्या स्प्रिंग टेंपल येथील पुतळ्यापेक्षाही उंच आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय रुपयाची घसरण सुरूच

Gauri Tilekar

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मांडता आले नाहीच

News Desk

जनसामान्यांच्या आस्था व भावनांचा सर्वोच्च न्यायलयाने आदर करावा !

News Desk