HW News Marathi
देश / विदेश

संकटाचा मुकाबला करण्याची क्षमता खच्चून भरलेली असते तोच देश सुरक्षित असतो – पंतप्रधान

राजस्थान | दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही दिवाळी साजरी करण्यासाठी राजस्थानच्या जैसलमेर येथील लोंगेवाल चौकीवर पोहोचले आहेत. तुमच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिल्यावर माझा आनंद द्विगुणीत होतो, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विस्तारवाद ही मानसिक विकृती असल्याचं सांगत मोदींनी चीनवरही अप्रत्यक्ष हल्ला चढवला आहे.

“मी आज तुमच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलो आहे. प्रत्येक भारतीयांच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे. त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद घेऊन आलो आहे, असं सांगतानाच वीर माता-भगिनींनाही मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या त्यागाला नमन करतो. ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी तैनात आहेत, त्यांनाही मी वंदन करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तुम्ही हिमाच्छादीत डोंगराळ भागात किंवा वाळवंटात कुठेही असले तरी तुमच्यामध्ये आल्यावरच माझी दिवाळी पूर्ण होते. तुमच्या चेहऱ्यावरील समाधानाची भावना पाहिल्यावर माझा आनंद द्विगुणीत होतो”, असंही ते म्हणाले.

तुमच्या शौर्याचा समस्त भारतीयांना अभिमान आहे. जगातील कोणतीही ताकद आमच्या वीर जवांनाना देशाच्या सीमेची सुरक्षा करण्यापासून रोखू शकत नाही, असंही ते म्हणाले. ज्या देशांमध्ये संकटाचा मुकाबला करण्याची क्षमता खच्चून भरलेली असते तोच देश सुरक्षित असतो. त्याच देशाचा विकास होत असतो, असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ मुख्यमंत्र्यांना पाठविला संदेश

Aprna

राबडी देवींच्या घरी CBI चा छापा; काय आहे नेमके प्रकरण

Aprna

बिहारचे राज्यपाल कोविंद एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार

News Desk