नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे सेक्टर ५८ मधील एका पार्कमध्ये मुस्लीम नागरिकांना नमाज पठण करण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. या पोलिसांनी पार्कमधील खुल्या जागेचा वापर कोणत्याही धार्मिक विधींसाठी करण्यास मनाई असल्याचे कारण देत याठिकाणी नमाज पठण करता येणार नाही, असा आदेश जारी केला आहे.
Noida: Police have issued a notice asking companies to ensure that no religious activities are carried out in a park in Sec-58 by their employees, that includes Friday namaz.Notice also states that companies will be held responsible if employees are found offering namaz in parks. pic.twitter.com/MY9PqzuDQk
— ANI (@ANI) December 25, 2018
या पार्कमध्ये सुरुवातीला १५-२० मुस्लीम नागरिक नमाज पठण करण्यासाठी येत होते. काही दिवसानंतर संख्येत वाढ होत, जवळपास २०० मुस्लीम नागरिक याठिकाणी नमाज पठण करण्यासाठी येऊ लागली. त्यामुळे या पार्कमध्ये फिरायला येणाऱ्या नागरिकांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली होती. यानंतर पार्कमध्ये नमाज पठण करण्यासाठी मुस्लीम समाजाच्या नागरिकांनी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती, परंतु दंडाधिकाऱ्यांनी त्याला नकार दिला होता.
Ajay Pal,SSP,Noida: Few people had asked for permission for religious prayers in a park in Sec 58. In spite of no permission granted from city magistrate office people congregated.The companies in the area were informed about it.The info is not specific to any particular religion pic.twitter.com/qxv2ryoyqs
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 25, 2018
या पार्कच्याजवळ असेलल्या परिसरात अनेक कंपन्या आहेत. मुस्लीम कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण केले तर त्यासाठी कंपन्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे अजब आदेश देखील नोएडा पोलिसांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. तसेच, कंपन्यांनी त्यांच्या मुस्लीम कर्मचाऱ्यांना पार्कमधील मोकळ्या जागांवर शुक्रवारचे नमाज पठण बंद करण्याच्या सूचना द्याव्यात, असेही पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, बुधवारी (१९ डिसेंबर) या पार्कमध्ये नमाज पठण केल्याप्रकरणी नौमान अख्तर यांच्यासमवेत दोघांना अटक करण्यात आली होती. या शनिवारी जामिनावर सुटका करण्यात आली. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती, असे पोलिसांनी यावेळी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.